मसुरे | झुंजार पेडणेकर :हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून १ एप्रिल रोजी मालवण तालुक्यातील माळगाव-गडकरवाडी (लाटकोंडवाडी) येथील हनुमान मंदिरात दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकराजा श्री. सुधीर कलिंगण प्रस्तुत, ‘श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर’ यांचा हा दणदणीत नाट्यप्रयोग रात्री १०:०० वाजता संपन्न होईल.उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.












