राज्य सरकारचे “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” नवे अभियान! प्रत्येक जिल्ह्यात राबविणार.

सुदृढ आरोग्य सेवेसाठी सर्वांनी सहभागी व्हा!

जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत कोट्यावधीची बक्षिसे

सिंधुनगरी : बाळ खडपकर

राज्य सरकारने नागरिकांच्या आरोग्य सेवा आणखी मजबूत व्हावी व सुदृढ पिढी निर्माण व्हावी यासाठी एक ऐतिहासिक अभियान हाती घेतले आहे. “प्रजा निरोगीत राज्य सशक्त” हे घोषवाक्य असलेले ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यस्तर, विभाग स्तर व जिल्हास्तरावत कोट्यावधी रुपयांची बक्षिसी शासनाने जाहीर केली आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या ग्रामपंचायती यांना फार मोठी संधी मिळणार आहे. पाच कोटी रुपयापासून जिल्हा पातळीवरील ग्रामपंचायत साठी पंधरा लाखापर्यंत बक्षीसी आहे. यावर्षी सुरू होत असलेले हे अभियान ३१ मार्च २०२७ पर्यंत राबविले जाणार आहे. या अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा ग्रामपंचायतिने ऑनलाइन नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पत्रकार परिषदेत केले.

या अभियानाची माहिती देण्यासाठी विशेष पत्रकार परिषद सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपाध्यक्ष दादा साईल, सभापती प्रितेश राऊळ, सभापती अनुराधा नारकर, रुहिता तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांचा सर्व अभियान कार्यक्रम व सर्व क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल असावा म्हणून सततचा प्रयत्न असतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान जिल्ह्यात अभिले जाणार आहे. जिल्हास्तरीय कमिटीचे अध्यक्षही पालकमंत्री आहेत.
जिल्हा परिषदा पंचायत समित्या व ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतया महत्त्वाकांक्षी अभियानाला अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष समिती कार्यरत राहणार असून ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे काटेकोर मूल्यमापन केले जाणार आहे. एकूण ५९ निर्देशांकांवर आधारित १०० गुणांच्या प्रश्नावलीद्वारे हे मूल्यमापन करण्यात येणार असून यासाठी गठित समिती काम पाहणार आहे.

या अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य, विभाग आणि जिल्हा स्तरावर आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. यामुळे ग्रामपंचायतींमध्ये आरोग्यविषयक उपक्रमांना चालना मिळणार आहे.
राज्यस्तरावर जिल्हा परिषदांसाठी प्रथम क्रमांकाला ५ कोटी, द्वितीय ३ कोटी आणि तृतीय २ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. पंचायत समिती स्तरावरही प्रथम २ कोटी, द्वितीय १.५ कोटी आणि तृतीय १.२५ कोटी रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

‘आरोग्य भूषण ग्राम’ या राज्यस्तरीय स्पर्धेत ग्रामपंचायतींना प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी आणि तृतीय २ कोटी रुपयांचे मोठे अर्थसाहाय्य मिळणार आहे. तसेच विभागस्तरावर ‘आरोग्य गौरव ग्राम’ पुरस्कारांतर्गत प्रथम १ कोटी, द्वितीय ७५ लाख आणि तृतीय ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हास्तरावर ‘आरोग्य प्रेरणा ग्राम’ या पुरस्कारांतर्गत प्रथम २५ लाख, द्वितीय २० लाख आणि तृतीय १५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

दरवर्षी ऑगस्ट महिन्यात राज्यस्तरीय सोहळ्यात राज्यपाल, मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व ४३१ ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून गावाच्या आरोग्यविकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.