रत्नागिरी: भारतीय जनता पार्टीचा आगामी स्थापना दिवस (६ एप्रिल) आणि मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी आज, सोमवार दिनांक ३० मार्च रोजी रत्नागिरी विधानसभा क्षेत्राची विशेष नियोजन बैठक पार पडली. भाजप जिल्हा कार्यालयात सायंकाळी ५ वाजता ही बैठक संपन्न झाली.
भाजप प्रदेशाकडून रत्नागिरी विधानसभा क्षेत्रासाठी ‘एस.आय.आर.’ (SIR) मोहिमेचे प्रमुख म्हणून श्री. दादा ढेकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना खालील मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. मतदार यादी पुनरावलोकन: पक्षाने नियुक्त केलेल्या BLO-2 प्रतिनिधींना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगण्यात आल्या. स्थापना दिवस नियोजन: ६ एप्रिल रोजी होणाऱ्या भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमांची माहिती देण्यात आली. नियोजित कार्यक्रम आणि उपक्रम स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत खालील उपक्रम राबवले जाणार असल्याचे दादा ढेकणे यांनी जाहीर केले.स्वच्छता मोहीम आणि जिल्हा कार्यालयात विशेष पूजा, विविध सामाजिक उपक्रम आणि संपर्क अभियान, शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद, पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे.
या बैठकीत शहर सरचिटणीस निलेश आखाडे, जिल्हा पदाधिकारी शेखर लेले आणि जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शहर उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अशोक वाडेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शहर सरचिटणीस संदीप सुर्वे यांनी केले.
या प्रसंगी राजू भाटलेकर, संदीप नाचणकर, मनोज पाटणकर यांच्यासह भाजपचे बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, नगरसेवक, जिल्हा व शहर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













