चिपळूण (प्रतिनिधी) : दरवर्षी पावसाळ्यात अनेक रोगांची साथ येते, जसे की डेंग्यू, मलेरिया, वायरल फीवर, डिसेंटरी इत्यादी. तसेच पावसाळ्यात कानदुखीपण डोके वर काढते. फरक फक्त एवढाच आहे की बाकीच्या आजारांसाठी आपण त्वरित डॉक्टरांकडे जातो, पण कान दुखीवर आपण घरगुती इलाज करतो. कान दुखी ही कानातील बुरशी किंवा कानाच्या पडद्याच्या मागचा रोगामुळे असू शकते, त्यामुळे घरगुती इलाज करण्यापेक्षा त्वरित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
कान दुखीची कारणे काय? पावसाळ्यात कानात पाणी गेल्यामुळे कानात बुरशी होऊन कानदुखी होऊ शकते. पावसाळ्यात कानात पाणी गेल्याने तो कोरडा करण्यासाठी आपण ear bud किंवा टोकदार वस्तू वापरल्यास कानात इजा होऊन कानदुखी होऊ शकते. पावसाळ्यात सतत सर्दी खोकल्यामुळे कानातून सर्दी बाहेर येऊ शकते त्याने कान दुखी होऊ शकते. हेडफोन्सच्या अतिवापरामुळे कान दुखी होऊ शकते कानातील घट्ट मळामुळे कान दुखी होऊ शकते.
पावसाळ्यात कानाची काळजी कशी घ्याल? आंघोळ करताना किंवा पावसात बाहेर जाताना कानात कापूस ठेवणे, कान कोरडा राहील याकडे लक्ष देणे, अंग दुखायला लागल्यास ear bud किंवा टोकदार वस्तूने कान साफ न करणे, कान दुखीसाठी घरगुती इलाज जसे की तेल किंवा गरम पाणी कानात घालू नये.
डॉक्टरांचा सल्ला- कान दुखीसाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मनाने ड्रॉप्स व तेल कानात टाकू नये =कान दुखी अंगावर काढल्यास पुढील उपचार कठीण होऊ शकतात =टोकदार वस्तू व ear bud कानात घालू नये. कान दुखी बरोबर सर्दी खोकला असल्यास पडद्याचा रोग असू शकतो, त्यासाठी त्वरित तज्ञांना दाखवावे.
-डॉ.प्रतीक शहाणे, इएनटी सर्जन
वालावलकर मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल चिपळूण.











