अधोरी प्रथा व जादुटोणा प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी | प्रतिनिधी
तालुक्यातील देवुड-कसबेवाडी येथे अघोरी प्रथा व जादुटोणा केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २७) पासून ते शनिवारी (ता. २८) सायंकाळी पाचच्या सुमारास लक्ष्मी स्टोअर्स या किराणा मालाच्या दुकानासमोर एका काजूच्या झाडाखाली निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुनिल शांताराम गोताड (वय ४६, रा. देवूड कसबेवाडी, रत्नागिरी) यांच्या मालकीच्या देवूड कसबेवाडी येथील किराणा मालाचे दुकानासमोरील एका काजूच्या झाडाखाली अज्ञाताने त्यांच्या कुटुंबाचे नुकसान व्हावे या उद्देशाना दुकानासमोरील मोकळ्या जागेत केळीच्या पानावर एक लिंबू, एक नारळ, व कोणत्यातरी प्राण्याची जुनाट लहान आकारीची कवटी असे साहित्य मांडून तांत्रिक पूजा किंवा अघोरी विधी करुन कुटुंबियांच्या मनात दहशत निर्माण केली. या प्रकरणी सुनिल गोताड यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.