खेड (प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात जामगे येथे शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश पार पडला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन उबाठा गटाचे तालुकाप्रमुख दत्ता भिलारे यांच्यासह भिलारे आयनी व साखरोली गावातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
या पक्षप्रवेशात श्री. आत्माराम गोपाळ कडू, श्री. मधुकर लाडू शेट्ये, सौ. रमणा शंकर शेट्ये, श्री. सुभाष भिकाजी शेट्ये, श्री. खाजीराम आत्माराम कदम, श्री. बाळू वसंत शिंदे, श्री. रामदास नामदेव परब, श्री. बाबुराव लाडू शेट्ये, श्री. सुभाष शेट्ये, श्री. तुकाराम कदम, श्री. हेमंत रवींद्र परब, श्री. अभिजीत आत्माराम कदम, श्री. निलेश विठोबा पाटील, श्री. केशव दत्तात्रय शेट्ये, श्री. जयवंत शंकर शेट्ये तसेच श्रीमती मिनाक्षी यांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
तसेच श्री. दत्ताराम वामन किलोर, श्री. गोविंद नामदेव किलोर, श्री. रमेश बाळकृष्ण किलोर, श्री. विशाल विनायक किलोर आणि श्री. रंजीत संजय किलोर यांनीही शिवसेनेत प्रवेश करत पक्षाची ताकद वाढवली. या कार्यक्रमावेळी शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास भाई कदम, रायगड लोकसभा संपर्कप्रमुख अनिल नवघरे, जिल्हा परिषद सदस्य व खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे तसेच जिल्हा परिषद सदस्य अरुण (अण्णा) कदम उपस्थित होते.
या घडामोडीमुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून उबाठा गटाला विशेषतः तालुकाप्रमुखांच्या पक्षप्रवेशामुळे मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. शिवसेनेची ताकद या भागात आणखी बळकट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.











