खासदार नारायण राणे साहेब यांचे प्रमोद रावराणे यांनी घेतले आशीर्वाद 

जि. प. सदस्य प्रमोद रावराणे यांचा आज 50 वा वाढदिवस 

खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा 

वैभववाडी l प्रतिनिधी :        राज्याचे माजी मुख्यमंत्री, खासदार माननीय नारायण राणे यांची जिल्हा परिषद सदस्य श्री प्रमोद रावराणे यांनी कणकवली येथे भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी प्रमोद रावराणे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त खासदार नारायण राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी देखील प्रमोद रावराणे यांना शुभेच्छा दिल्या. प्रमोद रावराणे यांनी खासदार नारायण राणे साहेब यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, राजेंद्र राणे, किशोर कांबळे, श्री खडपे, बंडया नारकर, सुरेश सावंत, उमेश राठोड व पदाधिकारी उपस्थित होते.