मंडणगड प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अंतर्गत वाद असल्याचे निराधार व खोट्या बातम्या माध्यमातून पसरवून जेष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांना कपोकल्पित वादामध्ये ओढण्याचे प्रयत्न चुकीचे असल्याचे प्रतिक्रीया पार्टीच्या तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रीयेत व्यक्त केली. आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराने एकजुटीने सर्व आव्हानांचा सामना केला. अगदी विभाजनानंतरही पक्ष पुन्हा एकदा ताकदीने उभा राहिला. या प्रवासात प्रदेशाध्यक्ष म्हणून खासदार सुनील तटकरे यांचे योगदान अमुल्य आहे. राष्ट्रवादी परिवारातील सर्व सदस्यांनी अत्यंत खंबीर भूमिका बजावली. दादांच्या पश्चात राष्ट्रवादी परिवाराच्या भावनांचा आदर करत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी परिवार दुःखातून सावरत असतानाच या परिवारात विघ्न निर्माण करण्यासाठी काहींनी प्रयत्न सुरू केले. अशा विघ्नसंतोषी प्रवृत्तींना कधीही यश मिळणार नाही. आदरणीय सुनेत्रावहिनी पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी परिवार एक संध आहे. चार दशकांचे आपल्या राजकीय जीवनाचे वाटचालीक खासदार सुनील तटकरे यांनी पुर्ण कोकणवार आपल्या नेतृत्वार छाप सोडली आहे. मंडणगड तालुक्यावर त्यांचे विशेष लक्ष राहीले येथील विविध विकास व नागरीकांचे प्रश्न आजही त्यांच्याच्या माध्यमातून मार्गी लागत आहे. अशा जेष्ठ नेत्यांना काल्पानिक वादात ओढण निर्षेधार्य असल्याचे सांगताना पार्टीची तालुक्यातील सर्व कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत खासदार सुनील तटकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे यावेळी निक्षून सांगतीले.













