मुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक; कोकण कन्या, जनशताब्दीसह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

मुंबई :
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यान रेल्वे ओव्हर ब्रीज पाडण्याच्या कामासाठी विशेष ‘पॉवर ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबई-गोवा मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले असून, ४ आणि ५ एप्रिल रोजी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

गाड्यांच्या प्रवासात करण्यात आलेले बदल खालीलप्रमाणे:
१. मधेच थांबणाऱ्या गाड्या (Short Termination – ४ एप्रिल):
मडगाव-मुंबई जनशताब्दी (१२०५२): पनवेलला प्रवास संपवेल.
मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेस (२२१२०): पनवेलला प्रवास संपवेल.
मडगाव-मुंबई मांडवी एक्सप्रेस (१०१०४): पनवेलला प्रवास संपवेल.
मंगळुरू-मुंबई एक्सप्रेस (१२१३४): ठाणे स्थानकापर्यंतच धावेल.
२. बदललेल्या ठिकाणाहून सुटणाऱ्या गाड्या (Short Origination):
मुंबई-मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस (२०१११): ४ एप्रिल रोजी मुंबई ऐवजी पनवेल स्थानकावरून सुटेल.
मुंबई-मडगाव जनशताब्दी (१२०५१): ५ एप्रिल रोजी पनवेल स्थानकावरून सुटेल.
मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेस (२२११९): ५ एप्रिल रोजी पनवेल स्थानकावरून सुटेल.
३. विलंबाने धावणाऱ्या गाड्या (Rescheduled – ५ एप्रिल):
मुंबई-मडगाव वंदे भारत (२२२२९): १५ मिनिटे उशिराने (सकाळी ५:४०) सुटेल.
दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस (११००३): तब्बल ६ तास २५ मिनिटे उशिराने (सकाळी ६:३०) सुटेल.
मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेस (१०१०३): ४० मिनिटे उशिराने (सकाळी ७:५०) सुटेल.
मुंबई-मडगाव विशेष गाडी (०११२९): सुमारे ७ तास उशिराने (सकाळी ७:१०) सुटेल.
याशिवाय, ४ एप्रिलची मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस (२०११२) दिवा, ठाणे आणि दादर दरम्यान ३० मिनिटे थांबवून (Regulated) चालवली जाणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. ऐन सुट्ट्यांच्या काळात गाड्यांच्या वेळेत झालेल्या या बदलांमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.