माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसा निमित्त प्रितेश राऊळ मित्र मंडळाचे आयोजन
वेंगुर्ले : दाजी नाईक
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार मा. ना. नारायणराव राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त रेडी येथे प्रितेश राऊळ मित्र मंडळ पुरस्कृत आणि दशावतार कलाप्रेमी ग्रुप रेडी यांच्या वतीने भव्य “दशावतार नाट्य महोत्सव २०२६” आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार ७ ते रविवार १२ एप्रिल असे सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सिंधुदुर्गातील विविध नामांकित दशावतार नाट्य मंडळांचे दर्जेदार नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.
रेडी ग्रामपंचायत मैदान येथे दररोज संध्याकाळी ७ वाजता या नाट्य महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. महोत्सवामध्ये
मंगळवार, दि. ०७ एप्रिल २०२६
चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण (देवेन नाईक प्रस्तुत) नाटक – “धुंडीराज गणेश”, बुधवार, दि. ०८ एप्रिल २०२६
दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग यांचे
नाटक – “मार्जार” गुरुवार, दि. ९ एप्रिल २०२६
चेंदवणकर गोरे पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, सुधा दळवी पुरस्कृत नाटक – “कालसर्प तांडव” सादर होणार. तर शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६ खानोलकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, खानोली वेंगुर्ला यांचे नाटक – “इंद्रजीत वध” शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ रोजी श्री सिद्धेश्वर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, कसई दोडामार्ग यांचे नाटक – “मायावी दुमती” आणि शेवटच्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी श्री देवी सातेरी महिला दशावतार नाट्यमंडळ, पावशी, कुडाळ यांचे नाटक – “भक्तांची पाठीराखा आदिमाया” हे दशावतारी नाटक सादर होणार आहे. तरी या भव्य नाट्य महोत्सवाचा लाभ सर्व रसिक प्रेक्षकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.










