बांद्यात उद्यापासून रंगणार ‘खासदार नारायण राणे चषक’ क्रिकेट स्पर्धेचा थरार 

पाच दिवसीय स्पर्धा 

बांदा : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित

‘खासदार नारायण राणे चषक बांदा’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बुधवार ८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. आळवाडा येथील पाटेश्वर मैदानावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होईल.

 

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, बांदा सरपंच प्रियांका नाईक, मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई उपस्थित राहणार आहेत.

 

पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, द्वितीय ५० हजार रुपये तसेच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक यासाठी वैयक्तिक स्वरूपाची पारितोषिके पुरस्कृत करण्यात आली आहेत. रविवार १२ एप्रिल रोजी पालकमंत्री नाम. नितेश राणे व कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा होईल.

 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ उपस्थित राहणार आहेत. क्रिकेट प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी उपसरपंच जावेद खतीब व बाळू सावंत यांनी केले आहे.