खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शिवसेना शाखा येथे उपक्रम
मालवण | प्रतिनिधी : कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त शुक्रवार 10 एप्रिल सकाळी 10 वा. शिवसेना शाखा मालवण येथे मच्छिमार महिलांना मत्स्य व्यवसायासाठी उपयोगी भेटवस्तू वाटप सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
अशी माहिती मालवण शिवसेना शाखा यांच्या वतीने देण्यात आली आहे.










