सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी येथील भटवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांच्या प्रयत्नातून आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विकास निधीतून सहा सोलर हायमस्ट दिवे बसविण्यात आले आहेत. या हायमस्ट दिव्यांचे उद्घाटन नुकतेच दिपाली भालेकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
भटवाडी प्रभागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन सभापती दिपाली भालेकर यांनी पालकमंत्र्यांकडे निधीचा पाठपुरावा केला होता. या कामामुळे आता संपूर्ण भटवाडी परिसर प्रकाशमय झाला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या उद्घाटन प्रसंगी पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर, भटवाडी विठ्ठल मंदिर व दत्त मंदिराचे पुजारी नंदकिशोर अळवणी, उदय अडवणी, प्रदीप जोशी, बंड्या केरकर, रवींद्र नाईक, प्रसाद कशाळीकर, दत्ता हनुसवाडकर, अनिल कोरगावकर, प्रोफेसर देठे, शशी अळवणी, नीलम जोशी, पूर्वा गवस, शेखर सुभेदार आणि देऊ गावडे उपस्थित होते.
तसेच अनुजा पिंगुळकर, चित्रा सावंत, संजय केरकर, गोविंद सावंत, रश्मी केरकर, जान्हवी सावंत, अनंत सुभेदार, शांताराम सुभेदार, रेखा कांडरकर, आनंदी सुभेदार, सुरेखा केरकर, प्रसन्न राणे, अक्षय नाईक, माधव कशाळीकर, विद्या कुडाळकर, दीपा गावडे, गुरुदास गावडे, मीनल नाईक, रिया नेवगी, किंजल केरकर, सौ. कांबली, आनंदी कशाळीकर, सौ. पुराणिक, सौ. चिचकर, उमिका नार्वेकर, राजलक्ष्मी सुभेदार, कल्पना मुळीक, तेजस गावडे, प्रोफेसर पाटील सर, तनया गावडे, प्रदीप सावरवाडकर, रतन सुभेदार, डॉ. रश्मी शुक्ल, तृप्ती बकले यांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रभागात होत असलेल्या कामांचा चढता आलेख पाहून स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. कार्यक्रमाचे पौरोहित्य गुरुदास सरवटे यांनी केले.













