लांजा (प्रतिनिधी) लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा या मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०० वाजता आगवे गुरववाडी येथील श्रीराम मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
मंडळाचे अध्यक्ष मोहन घडशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सभेला आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच. पंचायत समिती सभापती सौ मानसी आंबेकर, पंचायत समिती सदस्य यशवंत वाकडे, जिल्हा परिषद सदस्य संतोष रेवाळे, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांची देखील उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत रात्री १० वाजता लांजा तालुका पंचरंगी बहुरंगी नमन मंडळाचा नमनाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अनिल गुरव यांनी केले आहे.











