चराठा, ओटवणे रस्त्याच्या कामाबद्दल ग्रा. पं.सदस्य प्रशांत बुराण यांची नाराजी

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे चराठा मुख्य रस्त्याच्या कामाबद्दल वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच ओटवणे ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप शक्ती केंद्र प्रमुख प्रशांत बुराण यांनी या रस्त्याच्या कामाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याच्या दुरुस्ती नंतर ठेकेदाराने संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आणि यावेळी रस्त्याच्या मध्ये पाईप घालण्यासाठी मारलेला चर वाहनचालकांना धोकादायक ठरत आहे चर बुजवीला मात्र त्यानंतर त्यातील माती दबून त्याठिकाणी पुनः चर पडला आहे जो वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे.तसेच ज्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली त्या भिंतीला रस्त्याच्या बाजूने अंतर ठेवण्यात आले मात्र त्याठिकाणी कोणतेही मजबुतीकरण नसल्याने ओतलेली माती रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना वाहन हाकतानाही अडचणी येत आहेत.या मातीवरून गाडी घसरून लहान मोठे अपघातही घडत आहेत.रस्त्यावरील मारलेल्या चरामुळे आणि रस्त्यावर आलेल्या मातीमुळे जर अपघात झाल्यास याला सार्वजनिक बांधकाम खात जबादार राहणार कि संबंधित ठेकेदार असा संतप्त सवाल भाजपा शक्ती केंद्र प्रमुख तथा ओटवणे ग्रा.सदस्य प्रशांत बुराण यांनी केले. तसेच या ठिकाणी अपघात घडल्यास याला सर्वस्वी जबादार सार्वजनिक बांधकाम खात राहणार असल्याने यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली.