यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा 

माडखोल धवडकी नं. 2 शाळेची संस्कृती चोपडे तालुक्यात अव्वल!

संदीप गावडे फाउंडेशन आयोजित यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा सन 2025 -26 चा निकाल संस्थापक अध्यक्ष माननीय संदीपजी गावडे, परीक्षा समितीचे अध्यक्ष श्री सुधीर गावडे, सचिव श्री दत्ताराम सावंत तसेच श्री समीर जाधव यांच्या शुभहस्ते जाहीर करण्यात आला.

माडखोल धवडकी नं. 2 शाळेतील विद्यार्थिनी कु. संस्कृती तात्यासो चोपडे हिने 200 पैकी 182 गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. जि प शाळा कुणकेरी नं.2ची विद्यार्थिनी कु. आराध्या बाबू झोरे 200 पैकी 180 गुण मिळवीत द्वितीय, तर सावंतवाडी नं.2चा कु.राहील रियाज शेख 200 पैकी 172 गुण मिळवत तृतीय, कु.गौरांग बाबू वैज शाळा तळवणे न. 4 याने 200 पैकी 172 गुण मिळवत चौथा क्रमांक तसेच शाळा तळवणे नं.4 ची विद्यार्थिनी कुमारी श्रावणी शिवाजी कवडे 200 पैकी 172 गुण मिळवत पाचवी आली. यावर्षीच्या यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धेसाठी एकूण 328 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 243 विद्यार्थ्यांनी यश मिळविले. परीक्षेचा निकाल 74.08% लागला आहे. या नेत्र दीपक यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीपजी गावडे यांनी अभिनंदन करून सर्वांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पहिल्या टॉप फाईव्ह विद्यार्थ्यांना सायकल स्वरूपात भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यानंतरच्या 75 विद्यार्थ्यांना भेटवस्तू पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे

सन -2025 तसेच सन – 2026 चा बक्षीस वितरण सोहळा दि. 30 एप्रिल2026 रोजी बॅरिस्टर नाथ पै नगरपालिका हॉल सावंतवाडी येथे येथे ठीक दुपारी 2.00 वाजता संपन्न होणार आहे. तरी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी उपस्थित राहण्याबाबत आव्हान करण्यात येत आहे. संदीप गावडे फाउंडेशनच्या वतीने श्रीमती वंदना सावंत, श्रीमती तेजस्विता वेंगुर्लेकर,श्री उद्देश नाईक, श्री समीर जाधव,श्री सुहास गावडे, श्री निंगोजी कोकितकर,श्री सतीश राऊळ ,श्री विजय गावडे, श्री महेश सावंत, श्री जेडी पाटील, श्रीमती स्वाती पाटील,श्रीमती राधिका परब, श्री रोशन राऊत,श्रीगोविंद शेर्लेकर, श्री प्रताप सावंत, श्री परेश नाईक,श्री दीपक जाधव,श्री संजय बांबुळकर, तसेच कार्यकारणी मंडळ व अभ्यासक्रम मंडळ यांच्या अथक परिश्रमाने यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे पार पडली.