रॉयल मालवणी सिंधुदुर्ग तर्फे आयोजन
आचरा –अर्जुन बापर्डेकर
रॉयल मालवणी सिंधुदुर्ग तर्फे आचरा येथे आयोजित जिल्हास्तरीय खुली कराओके गीत, गायन स्पर्धेत
वैष्णवी चव्हाण( वजराट ) हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक श्री. राकेश मिठबावकर (देवगड) आणि तृतीय क्रमांक संतोष पांचाळ (पडेल)यांनी मिळविला.
लौकिक सांस्कृतिक भवन, आचरा येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण ३६ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी रॉयल मालवणी संस्थेकडून आकर्षक चषक तसेच डॉ. धनंजय रासम यांच्या हस्ते रु. ६६६६/- प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांकासाठी आकर्षक चषक व संतोष कोदे यांच्याकडून रु. ४४४४/- देण्यात आले, तर तृतीय क्रमांकासाठी आकर्षक चषक व संजय वेंगुर्लेकर यांच्या हस्ते रु. २२२२/- देण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व मेडल्स देऊन गौरविण्यात आले.
उत्तेजनार्थ पारितोषिक सौ. पूजा गोसावी (ओरोस) यांना प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेसाठी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शाखा आचरा यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास सुरेंद्र सकपाळ, सुरेश ठाकूर , लोकमान्य पतसंस्थेचे मोर्वेकर तसेच रॉयल मालवणी, सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ. अभय परब, सेक्रेटरी डॉ. अमोल हूले, खजिनदार डॉ. स्वप्नील भोगटे व इतर सदस्य उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. राहुल पंतवालालकर आणि डॉ. निशा धुरी कोचरेकर यांनी उत्कृष्टपणे काम पाहिले. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. सिद्धेश सकपाळ व डॉ अमोल हुले यांनी केले.












