आर. पी. डी हायस्कूल चे शिक्षक दशरथ शृंगारे यांना “ज्ञान साधना” पुरस्कार

. आज होणार पुरस्काराचे वितरण .

ओटवणे (प्रतिनिधी )सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने गुणवंत शिक्षकांसाठी मानाचा समजला जाणारा ज्ञान साधना व विज्ञान भास्कर पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून राणी पार्वती देवी हायस्कूल चे गणित विषयाचे शिक्षक दशरथ शृंगारे यांना ज्ञान साधना पुरस्कार जाहीर झाला असून या बद्दल संस्थेच्या वतीने राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी, संस्था अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत,शिक्षक वृंद,यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. ओटवणे सारख्या ग्रामीण भागातील रवळनाथ विद्यामंदिर चा गुणवंत विधार्थी ते आर. पी. डी. हायस्कूल मध्ये एक हुशार विधार्थी प्रिय आदर्श शिक्षक अशी अल्पा वधित ओळख निर्माण करणाऱ्या शृंगारे सरांचा ओटवणे गावच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात मोठं योगदान आहे.एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती ओटवणे दशक्रोशीत आहे. तसेच महाराष्ट्रीय यादव चॅरेटी ट्रस्ट शाखा सिंधुदुर्ग चे कार्याध्यक्ष ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. आणि हे सर्व करत असताना विद्यादानाच पवित्र काम ही ते प्रामाणिक पणे करीत आहेत.राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्यू. कॉलेज सावंतवाडी माध्यमिक विभागात गणित हा विद्यार्थ्यांसाठी कठीण समजला जाणारा विषय शिकवत असताना विद्यार्थ्यांना त्या विषयाची गोडी लावण्या बरोबर शाळेच्या निकालाच्या परंपरेत महत्वाचा वाटा उचलत आहे. त्यांनी केलेले अध्ययनाचे आणि विधार्थी घडविण्याचे काम पाहता त्यांचा या सन्मानासाठी विचार करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर विविध स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.हा सन्मान सोहळा बुधवार २९ एप्रिल रोजी ठीक २. ३० वा. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी च्या सभागृहात संपन्न्न होणार आहे.