शंकर वैद्य साखरपा:
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे झालेल्या सरपंच पोटनिवडणुकीत धनश्री राजेंद्र जोशी यांनी अटीतटीच्या लढतीत विजय संपादन केला. त्यांनी प्रतिस्पर्धी रुपाली राजेंद्र किर यांचा ५७ मतांनी पराभव करत सरपंचपदावर आपली मोहोर उमटवली.
या निवडणुकीत एकूण १३३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये धनश्री जोशी यांना ६८५ मते मिळाली, तर रुपाली किर यांना ६२८ मते मिळाली. तसेच २० मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला.
संपूर्ण निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून शेवटपर्यंत दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. अखेर धनश्री जोशी यांनी थोडक्यात आघाडी घेत विजय मिळवला. त्यांच्या या यशाबद्दल कोंडगाव परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. तर रुपाली किर यांनीही शेवटपर्यंत दिलेली लढत लक्षवेधी ठरली.
तसेच साखरपा ग्रामपंचायतीच्या सरपंच पोटनिवडणुकीत रश्मी रवींद्र साळसकर यांनी दमदार विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी भाग्यश्री संजय सुर्वे यांचा १२४ मतांनी पराभव करत सरपंचपदावर आपला हक्क सिद्ध केला.
या निवडणुकीत एकूण ८२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये रश्मी साळसकर यांना ४६३ मते मिळाली, तर भाग्यश्री सुर्वे यांना ३३९ मते मिळाली. तसेच २२ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला.
संपूर्ण निवडणूक चुरशीची झाली असून शेवटपर्यंत दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. अखेर रश्मी साळसकर यांनी आघाडी कायम राखत विजय मिळवला. त्यांच्या या यशाबद्दल साखरपा परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर भाग्यश्री सुर्वे यांनीही शेवटपर्यंत दिलेली लढत लक्षवेधी ठरली.
Home महत्वाच्या बातम्या कोंडगाव सरपंच पोटनिवडणूकीत धनश्री जोशी तर साखरपा सरपंच पोटनिवडणूकीत रश्मी साळसकर विजयी











