रत्नागिरी | प्रतिनिधी:
रत्नागिरी नगर परिषदेची जुनी इमारत पाडून आता नगरपरिषदेचा कारभार नव्या इमारतीमध्ये सुरू होत असतानाच नव्या इमारतीच्या सभागृहाला कोणते नाव द्यायचे हा मुद्दा चर्चेचा आणि उत्सुकतेचा ठरला होता. गुरुवारी 30 एप्रिल रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला. या सभागृहाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे ठरले आहे. या प्रस्तावाचे सर्वांनीच स्वागत केले.
यावेळी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी एक सूचना करताना सांगितले की यापुढे नामकरणासाठी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नावांचाही विचार करावा.










