प्रा गौस मुल्ला यांचा सेवानिवृत्तीप्रसंगी सत्कार

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा गौस दादासो मुल्ला सेवानिवृत्त झाले.या प्रसंगी त्यांचा शाळा व संस्थेतर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष मनोज शिंदे,सचिव श्रीकांत फाटक, मुख्याध्यापक महादेव परब,शिक्षण विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने,केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड, उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,सहसचिव दीपक शिगवण,संजय सहस्त्रबुद्धे,पर्यवेक्षक अंबादास घाडगे उपस्थित होते.
प्रा गौस मुल्ला यांनी २९ वर्षे या कनिष्ठ महाविद्यालयात मराठी व हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून काम केले.तर त्यांनी विभागीय परीक्षा मंडळात उच्च माध्यमिक साठी मॉडरेटर,चीफ मॉडरेटर असे काम पाहिले.सत्कार सोहळ्या प्रसंगी सहकारी शिक्षक गौरव पोंक्षे,संतोष कुलकर्णी,रवींद्र पवार,अंबादास घाडगे,शिक्षक प्रतिनिधी महादेव शिंदे,सौ मालती लिंगायत गुरव,सौ विशाखा धावडे,संजय सूर्यवंशी आदिनी तर संस्थेकडून दीपक शिगवण,शशिकांत घाणेकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना भावूक झालेल्या प्रा गौस मुल्ला यांनी,त्यांच्या सेवा काळात त्यांना विविध मार्गानी मदत केली आहे अशांचे आभार मानले.कार्यक्रमावेळी क्रीडा शिक्षिका क्रांती म्हस्कर ह्यांचा देखील सत्कार करण्यात आला.कार्यक्रमांचे सूत्रसंचालन ओंकार नामजोशी यांनी केले.