देवरूख आठवडा बाजारात लहान मुलाकडून व्यापाऱ्याची पैशांची बँग चोरण्याचा प्रयत्न

ग्राहकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला
आरडाओरड झाल्यावर मुलग्याने ठोकली धूम
आठवडा बाजारात पोलीस नसल्याने व्यक्त होतेय तीव्र नाराजी
निलेश जाधव / देवरूख

देवरूखमधील आज रविवारी दु. १२.३० वाजण्याच्या सुमारास आठवडा बाजारात चोरीचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे

आठवडा बाजारात मच्छीमार्केटजवळ दुकान थाटून खोबरे आणि गरम मसाले विकणाऱ्या महिलेची पैशांची बँग सुमारे ११ ते १२ वर्षीय मुलाने चोरण्याचा केला प्रयत्न

मात्र ग्राहकांनी आरडाओरड करताच पैशांची बँग तेथेच टाकून मुलाने देवरूख-साखरपा रस्त्याच्या दिशेने पोबारा केला

चोरीचा हा प्रकार आठवडा बाजारात सगळीकडे समजताच एकच खळबळ उडाली

एरव्ही आठवडा बाजारादिवशी तैनात असणारे पोलीस व होमगार्ड आज दुपारच्या सुमारास मात्र कोणीच आठवडा बाजारात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.