आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली कर्तुत्व निघणार झळाळून
लांजा (प्रतिनिधी) मुस्लिम वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून गेले एक तप समाजकारणासाठी खर्च घालणाऱ्या, लांजा येथील सामाजिक कार्यकर्ते अकिल नाईक यांनी नुकताच आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. समाजकारणात यशस्वी इनिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणात एन्ट्री केली असून आमदार किरण सावंत यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात देखील ते आपली छाप पाडतील असा विश्वास व्यक्त होत आहे.
मुस्लिम वेल्फेअर सोसायटी या संस्थेचे कार्याध्यक्ष असलेल्या अकिल नाईक हे गेल्या १२ वर्षांपासून समाजकारणात आहेत. कोरोना महामारी, रायगड, चिपळूण येथे आलेल्या महापूर या संकटाच्या कालावधीमध्ये अकिल नाईक यांनी मुस्लिम वेल्फेअर सोसायटी च्या माध्यमातून लाखो रुपये किमतीचा अन्नधान्याच्या किटचा पुरवठा केला होता. याशिवाय गोरगरीब लोकांना मदत, शैक्षणिक मदत अशा विविध मार्गाने त्यांची समाजसेवा सुरू असते.
गेले -बारा वर्षांपासून समाजकारणात यशस्वी ठसा उमटवल्यानंतर अकिल नाईक यांनी नुकताच आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अखिल नाईक यांच्यासह माजी नगरसेवक परवेझ घारे, यांच्या सह सुहेल मापारी, जावेद पठाण, शब्बीर शेरखान, अब्दुल शेरखान, सय्यद अली शेरखान, महमद अली शेरखान, हुसेन खान पठाण, हसन महालदार, सरफराज पन्हळेकर, अकिल रफिक नाईक, खालिद मुल्ला, असलम घारे, अन्वर पन्हळेकर, नजीम घारे, अतीक पन्हळेकर, समीर घारे, फिरोज घारे, नदीम मापारी, समीर पन्हळेकर, इरफान पन्हळेकर, नजीर पन्हळेकर, नबील पन्हळेकर, अरीफ नाईक, शब्बीर नाईक, सय्यद मोईन खान, मोसिन पन्हळेकर, साहिल पन्हळेकर, फैजान पन्हळेकर आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला
यावेळी लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर, शिवसेना विभाग प्रमुख शाम खानविलकर, स्वीकृत नगरसेवक सचिन डोंगरकर, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, जिल्हा परिषद सदस्य विनिता गांगण,मनिषा गांगण ,लिला घडशी, अरुण पत्की, जिल्हा बँक संचालक मुन्ना खामकर,आदींसह अनेक स्थानिक पदाधिकारी, उपस्थित होते.













