भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या चिपळूण जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट

जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले स्वागत

चिपळूण (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांनी बुधवार दि. ९ रोजी सायंकाळी भाजपच्या चिपळूणमधील जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि भाजपच्या विशेष निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, जिल्हा चिटणीस ॲड. नयना पवार, योगेश शिर्के, अनिल सावर्डेकर, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक, रावी मोरे, पंचायत समिती सदस्य सायली वाजे, सुप्रिया देवरुखकर, नगरसेविका रसिका देवळेकर, शीतल रानडे, वैशाली निमकर, अंजली कदम, नगरसेवक संदीप भिसे, शुभम पिसे, चिपळूण शहर मंडल प्रभारी विजय चितळे, चिपळूण ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष आदिती गुडेकर यांच्यासह चिपळूण ग्रामीण आणि चिपळूण शहर मंडलातील प्रमुख पदाधिकारी तसेच जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.