विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार – डॉ.विवेक नातू मुंढर (वार्ताहर):
डॉ.तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान मार्गताम्हाने तालुका चिपळूण संचलित दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय आणि भागिर्थिबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत झांज पथकाने करण्यात आले.त्यानंतर संस्था प्रमुख डॉ.विवेक नातू याच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.डॉ.तात्यासाहेब नातू याच्या प्रतिमेला अंजलवेल गावाचे सामाजिक कार्यकर्ते यशवंत बाईत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तर सरस्वती प्रतिमेला डॉ.विवेक नातू याच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर विचारमंचावरील सर्व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य मंगेश गोरीवले यांनी केले.आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य मंगेश गोरिवले यांनी कॉलेजमधील उपक्रमांची माहिती दिली.
वाणिज्य शाखेमध्ये प्रथम क्रमांक संस्कृती राहुल बाईत (८५.७६%)द्वितीय क्रमांक अनुष्का संतोष पडवळ(७८.६७%,) तृतीय क्रमांक प्रांजळ उदय उजाळ (७०.००%)तर कला शाखेत प्रथम क्रमांक आरती विजय नरवणकर,(७४.००)द्वितीय क्रमांक आदिती दिलीप गुडेकर(७३.५०)तृतीय क्रमांक रिया विजय मिशाळ (६७.००)यांचा आला आहे.या सर्व विद्यार्थ्यांचे डॉ.विवेक नातू आणि सर्व मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बारावी नंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी संस्था परिपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य करेल असे मत संस्था प्रमुख डॉ.विवेक नातू यांनी व्यक्त केले.ग्रामीण भागातील शाळा कॉलेज मुळे सर्वाँना शिक्षणाची सुविधा देण्यात संस्था परिपूर्ण यशस्वी ठरली आहे.
तसेच शालेय शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देणारे अंजनवेल कॉलेज एकमेव आहे असा आशावाद व्यक्त केला.कॉलेज मध्ये संगणक सहाय्यक कोर्स आणि इलेक्ट्रिकल टेक्निशियन कोर्स यशस्वी पणे राबविले जात आहेत.पालक वर्गातून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून डॉ.विवेक नातू, बावाशेठ भालेकर,यशवंत बाईत,अजीज मस्तान,गंगाराम भुवड,श्रावणी पेडणेकर,शैलेश रोहिलकर,विश्वनाथ रोहिलकर ,श्रावण रोहीलकर ,मारुती रोहीलकर, हरीशचंद्र भुवड,ललित दुर्गोली,रमेश भुवड,सचिन दाभोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा .उमेश जाधव तर आभार दिपाली कांबळे यांनी व्यक्त केले.