वेंगुर्ले शहरातील तांबळेश्वर स्मशान भूमीत असलेल्या लाकडांना आग : हजारो रुपयांचे नुकसान..

आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले शहरातील तांबळेश्वर स्मशान भूमीत असलेल्या लाकडांना आज गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत स्मशानभूमीत असलेली हजारो रुपयांची लाकडे जळून खाक झाली आहेत.
या आगी ची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वेंगुर्ले नगर परिषदेच्या अग्निशमन बंबांने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.