राज्य महामार्गावर आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून उबाठा, काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

काँग्रेसचे किरण टेंबुलकर, कुलकर्णी यांचा समावेश 

उबाठाचे अनेक कार्यकर्ते सामील

देवगड : आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी काढण्यात येणारा मोर्चा होऊ न कारण देत उबाठा व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या प्रकरणी देवगड पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

आंबा हंगामातील नुकसान भरपाईच्या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले होते. मोर्चास परवानगी न मिळाल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देवगड परिसरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला.

 

या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांच्यासह उबाठा पदाधिकारी गणेश वाळके, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण टेंबुलकर, राजेश पाटील, विजय पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, उबा ठा चे स्वीकृत नगरसेवक सुधीर तांबे, उबाthaचे तेजस मामघाडी, प्रसाद दुखंडे आदी सहभागी झाले होते.

 

दरम्यान, देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र महाले यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राज्य महामार्गावर पुतळा दहन करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवगड पोलीस करत आहेत.