राजापूर (वार्ताहर): लेखक दिग्दर्शक अभिनेता राजेश देशपांडे यांच्या ‘सृजन द क्रिएश’ या संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रहसन स्पर्धेला महाराष्ट्र भरातून उत्फुर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत उत्कृष्ट प्रहसन प्रथम क्रमांक सुनीला लाळे आणि मुकेश सातपुते प्रायोजित सर्वोत्कृष्ट प्रहसन – यम्मी मम्मी (जोकर्स थिएटर,मुंबई) याना देण्यात आला. त्यांना रोख १० हजार पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
कोरोना काळात सृजन द क्रिऐशन संस्थेने ऑनलाइन कार्यशाळा सुरू केली. त्या कार्यशाळेत अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ह्या कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरातून कलाक्षेत्रात करियर करू इच्छिणारे नवोदित कलाकार एकत्र आले आणि विविध उपक्रम करू लागले. गेल्या सहा वर्षात ह्या संस्थेच्या कलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धा, अनेक एकांकिका, शॉर्ट गिल्म्स स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पुरस्कार मिळवले. सृजन द क्रिएशन मधील अनेक कलाकार आज व्यावसायिक रंगभूमी, मालिका, चित्रपट क्षेत्रात आपले कलागुण दाखवत आहेत. अशांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बोरिवली शाखेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ गोट्या सावंत आणि मान्यवर परीक्षक प्रशांत लोके आणि अतुल तोडणकर ह्यांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन करून स्पर्धेचा शुभारंभ झाला. ह्या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून २३ संघानी भाग घेतला. संजय डहाळे ह्यांनी उपलब्ध करून दिलेल्या बोरिवली येथील हॉल वर हाउसफुल गर्दीत स्पर्धा हश्या टाळ्यांच्या गजरात पार पडली.
या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे.: उत्कृष्ट प्रहसन द्वितीय – ७०००/- ओमकारइंटेरिओ प्रायोजित सर्वोत्कृष्ट प्रहसन द्वितीय – प्रपोजल (थिएटरकर, सोलापूर), तृतीय – ४०००/- प्रदीप काजरोळकर प्रायोजित सर्वोत्कृष्ट प्रहसन तृतीय – लावा ताकद विवेकाची (डॉ टी के टोपे कॉलेज, परळ).
उत्कृष्ट अभिनेता विभागात प्रथम – ३०००/- सुरेश चव्हाण प्रायोजित उत्कृष्ट अभिनेता प्रथम – अभिजीत केंगार (प्रपोजल), द्वितीय- २०००/-मृदुल हेयर एंड ब्यूटी स्टूडियो प्रायोजित उत्कृष्ट अभिनेता द्वितीय (विभागून) -चिदंबर अक्कल (प्रपोजल) मृदुल हेयर एंड ब्युटी स्टूडियो प्रायोजित उत्कृष्ट अभिनेता द्वितीय (विभागून) – रोहित लगाडे (पोटात दुखतय), तृतीय- १०००/-सौ. वासंती माळवदे यांच्या स्मरणार्थ श्री ललितकुमार माळवदे प्रायोजित उत्कृष्ट अभिनेता तृतीय (विभागून) -प्रसन्न रणश्रुंगारे (प्रपोजल)
सौ वासंती माळवदे यांच्या स्मरणार्थ श्री ललितकुमार माळवदे प्रायोजित उत्कृष्ट अभिनेता तृतीय (विभागून) – देवांश खेंगले (बोल भिडू) याना सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट अभिनेत्री विभागात प्रथम- ३०००/-सुरेश चव्हाण प्रायोजित उत्कृष्ट अभिनेत्री प्रथम – अक्षता साळवी (यम्मी मम्मी), द्वितीय- २०००/-
मृदुल हेयर एंड ब्यूटी स्टूडियो प्रायोजित उत्कृष्ट अभिनेत्री- कृपा गायकवाड (यम्मी मम्मी), तृतीय- १०००/-सौ. वासंती माळवदे यांच्या स्मरणार्थ ललितकुमार माळवदे प्रायोजित उत्कृष्ट अभिनेत्री तृतीय- वैशाली सावने ( छावा बाबा) यांना देण्यात आला.
उत्कृष्ट लेखक म्हणूनप्रथम- ३०००/-हेमंत भारंबे प्रायोजित उत्कृष्ट लेखक प्रथम- स्वप्नील जगताप (यम्मी मम्मी), द्वितीय- २०००/- कल्पना प्रभाळकर प्रायोजित सौ वासंती प्रभाळकर यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट लेखक द्वितीय – अभिजीत केंगार (प्रपोजल), तृतीय- १०००/- मृदुल हेयर एंड ब्यूटी स्टूडियो प्रायोजित उत्कृष्ट लेखक तृतीय- साईश तोडणकर (लावा ताकद विवेकाची).
तर उत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम – ३०००/-खालिदा शेख प्रायोजित उत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम – स्वप्नील जगताप (यम्मी मम्मी), द्वितीय – २०००/- दीपक लांजेकर प्रायोजित उत्कृष्ट दिग्दर्शक – साईश तोडणकर (लावा ताकद विवेकाची), तृतीय- १०००/-ओमकार इंटेरियो प्रायोजित उत्कृष्ट दिग्दर्शक तृतीय- अभिजीत केंगार (प्रपोजल).
बालकलाकार विभागात२०००/- सृजन देशपांडे प्रायोजित बालकलाकार
सांघिक सादरीकरण (विभागून), लिटल चॅंप्स-(व्याकरणाचा पंचनामा), राडा थिएटर (बोल भिडू ) तर विशेष लक्षवेधी सादरीकरण १) आम्ही बी घडलो २) पोटात दुखतय ३) सहलीला जायचा, जायचा सहलीला तर उत्तेजनार्थ म्हणून
१) अभिजीत कांबळे- सहलीला जायचा, जायचा सहलीला २) रोहित चिविलकर- छावा बाबा ३) प्रतीक पाले – आम्ही बी घडलो ४) दिव्येश इंदुलकर – सिटी ऑफ ड्रीम्स ५) प्रशांत पाटील – संमेलन आगळ वेगळ ६) मीता चौहान – बाईमॅडम ७) मनस्वी कुंटे – व्याही व्याही भिकारी ८) प्रतीक तांदळे – बैठक ९) आर्येश घेवडे – स्पर्धा १०) विशाल मोहिते – बी. एम. डब्लू. ११) मनाली अभ्यंकर – ट्रिपल शेजवान… अंडा मारके याना प्रदान करण्यात आला.













