नातेवाईकांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली तक्रार
कणकवली : तालुक्यातील हळवल येथील सोनाली श्रीधर ठाकूर (वय २२, रा. हळवल पिंपळवाडी) ही तरुणी १७ मे रोजी मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र त्यानंतर ती अद्याप घरी परतलेली नाही. याप्रकरणी तिचे नातेवाईक विलास ठाकूर (रा. हळवल पिंपळवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.












