परबवाडा येथून दुचाकी चोरीस 

वेंगुर्ले पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा येथून शनिवारी मध्यरात्री एक स्प्लेंडर प्लस मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मठ कणकेवाडी येथील नवीन मधुकर गावडे यांनी दिलेल्या तक्रारी मध्ये असे म्हटले आहे की, आपला मित्र प्रवीण पाणकर यांचे घराचे बाजूला रस्त्याचे कडेला लावून ठेवलेली आपली मालकीची स्प्लेंडर प्लस गाडी नं. एमएच ०७ जे २३६५ ही चोरीस गेली आहे. एक दिवस सर्वत्र शोध घेतला. पण मोटरसायकल मिळून आली नाही. त्यामुळे चोरीची तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, या प्रकरणी अधिक तपास पो. हे. कॉ. चव्हाण करीत आहेत.