कणकवली नगरपंचायतीतर्फे १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उद्या सत्कार सोहळा

 

 

कणकवली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षेत कणकवलीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उज्ज्वल यशाचे कौतुक करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्यातने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा (उद्या) गुरुवार दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल. (HPCL) सभागृहात संपन्न होणार आहे. कणकवलीतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी – प्रमाणे यंदाही आपल्या यशाची परंपरा कायम राखत तालुक्याचा आणि शहराचा गौरव वाढवला आहे. विद्यार्थ्यांच्या या कष्टाचे कौतुक करणे आणि त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नगरपंचायतीच्यातने आयोजित या गुणवंत गौरव सोहळ्याला शहरातील नागरिक, शिक्षणप्रेमी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कणकवली नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.