सावली जनसेवा शिक्षण संस्था व वरवडे ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम
३५ जणांची हृदय तपासणी, मोफत औषधांचे वाटप
कणकवली : सावली जनसेवा शिक्षण संस्था, वरवडे आणि वरवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मागासवर्गीय नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३५ जणांची हृदय तपासणी करण्यात आली. तसेच तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
या शिबिराला वरवडेच्या सरपंच करुणा घाडीगावकर, सावली जनसेवा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रसाद देसाई, उपाध्यक्ष संतोष पप्पू पुजारे, ग्रामसेविका चव्हाण मॅडम, ग्रामपंचायत सदस्य विशाल कासले, डॉक्टर संकेत पोकळे, सायली कासले, सागर जाधव, सिद्धार्थ कदम आणि सुरेश जाधव उपस्थित होते. यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
मागासवर्गीय नागरिकांना आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये ३५ जणांची हृदय तपासणी करण्यात आली असून, नागरिकांना मोफत औषधे देण्यात आली. सावली जनसेवा शिक्षण संस्था, वरवडे आणि वरवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा आरोग्य शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला.













