BREAKING: आंबा घाटातील रिक्षा अपघातातील रिक्षा चालकाचा अखेर मृत्यु

शंकर वैद्य । साखरपा
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी – नागपूर महामार्गवरील आंबा घाटातील गोवरेवाडी बस थांब्याजवळ आज पहाटे झालेल्या रिक्षा अपघातातील रिक्षा चालक सुरेश शामराव साळोखे वय ६६ यांचे रत्नागिरी येथे उपचार सुरु असतानाच मृत्यूने त्यांना गाठले.

मात्र अपघात कसा झाला याची खातरजमा पोलीस करीत असून अज्ञात वाहनाने धडक दिली का? याची माहिती साखरपा पोलीस बारकाईने करीत असून आंबा येथील सी सी टी व्ही फुटेजची मदत घेतली जाणार आहे. मात्र अपघाताचे निश्चित कारण समजू शकले नाही.साखरपा पोलीस अधिक तपास करीत आहेत.