रत्नागिरी शहर आणि परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात

रत्नागिरी : शनिवारी उष्णतेची तीव्रता वाढलेली असताना रविवारची सकाळ मात्र मुसळधार पावसाने उजळली आहे रत्नागिरी शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह वेगवान वारा आणि पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या आहेत.

यामुळे परिसरात सुखद गारवा निर्माण झाला असून मान्सून गोवा स्किप करून थेट रत्नागिरीत दाखल झाला की काय अशी भावना निर्माण झाली आहे.

सध्या आंबा हंगामाच्या शेवटच्या  टप्प्यात असताना या पावसाचा त्यावर किती परिणाम होईल ते लवकरच स्पष्ट होणार आहे