साखरपा ची सुकन्या आंतरराष्ट्रीय कँरमपटू आकांक्षाला 15 वे राज्यविजेतेपद

शंकर वैद्य साखरपा:
संगमेश्वर तालूक्यातील देवडे (साखरपा)ची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कँरमपटु व मा.शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती आकांक्षा उदय कदम हीला तीच्या कारकिर्दीतील 15 वे राज्यस्तरीय विजेतेपद प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र कँरम असोसिएशन व सिव्हिल फेडरेशन रोटरी क्लब आँफ बोरीवली पुरस्कृत बोरीवली येथील मंडपेश्वर सिव्हिल फेडरेशन ( एम सी एफ ) येथे दिनांक 23,24,25 मे 2026 रोजी राज्य मानांकन कँरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेला साखरप्याची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कँरमपटु आकांक्षा ही सहभागी झाली होती.तीने रंगतदार ,अप्रतिम खेळी करत सेमी फायनलला मिताली पिंपळेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
आकांक्षाने अंतिम सामन्यात ठाण्याच्या समृद्धी घाडीगांवकर वर तीन सेटपर्यत रंगलेल्या सामन्यात दिमाखात विजय मिळवून कारकिर्दीतील कँरमचे 15 वे विजेतेपद मिळविले.
आकांक्षाला गतवर्षी महाराष्ट्र शासनाचा मानाचा,प्रतिष्ठेचा समजला जाणारा मा.शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
तीच्या या यशाबद्दल तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.