अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने आयोजित
लांजा ( प्रतिनिधी) अखिल भारत हिंदू महासभा रत्नागिरी जिल्हा च्या वतीने २८ मे रोजी कल्पना कॉलेज लांजा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे
या कार्यक्रमाला लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सावली कुरूप, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश किनरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून नंदकुमार लिंगायत हे उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. समीर घोरपडे, मनोहर रणदिवे, तीलोत्तमा खानविलकर हे देखील उपस्थित राहणार आहेत.
कल्पना कॉलेज लांजा येथे सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे












