सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक मोहन दहिकरांची हकालपट्टी करा!”

दरमहाअडीच ते तीन कोटीच्या हप्तेबाजीमुळे बेकायदेशीर धंदा ऊत! गांजा शेतीकडे दुर्लक्ष. 

तरुण पिढी व्यसनाधीन व्हायला पोलीस पोलीस अधीक्षक जबाबदार

सिंधुनगरी l प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदेशीर दारू, ड्रग्ज, मटका आणि जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असून या सर्व अवैध धंद्यांमधून जिल्हा पोलीस दलाला दरमहा अडीच ते तीन कोटी रुपयांचा हप्ता मिळत असल्याचा गंभीर आरोप आमदार निलेश राणे यांनी केला आहे. पोलीस दलावर आक्षेप नाही परंतु ही हप्तेबाजी पोलीस अधीक्षकांसाठी होत आहे, या हप्तेखोरीमुळे तरुण पिढी आणि अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा दावा करत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांना जिल्ह्यातून हटवावे, अशी आक्रमक मागणी आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

 

पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्या कार्यपद्धतीचा पोलखोल आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथील पत्रकार परिषदेत केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल, बँक संचालक बाबा परब व अन्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

 

बेकायदेशीर दारूमुळे ड्रग्ज मुळे तरुण पिढी व अनेक संसार बरबाद होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदेशीर दारू मटका जुगार असे बेकायदेशीर व घटना वाढू लागल्या आहेत. या सर्व बेकायदेशीर व्यवहारातून सिंधुदुर्ग पोलिसांना दरमहा अडीच ते तीन कोटीच्या रुपयांच्यावर हप्ता सुरू आहे! जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्यासाठी जिल्हा पोलीस दल ही हप्तेबाजी करीत आहे, त्यामुळे या जिल्ह्यातून त्यांचे हकालपट्टी करा व या जिल्ह्यातून त्यांना पळवून लावा अशी आपली भूमिका असल्याचे आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

शाबित गुन्ह्यांचे प्रमाण २०% च्या खाली

जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी 22 मे 2025 रोजी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांची कार्यपद्धती जिल्ह्याच्या तरुण पिढीला नुकसान करणारी नागरिकांना त्रास देणारी असल्याचे आता उघड होत आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर न्यायालयात हे गुन्हे शाबित होण्याचे व शिक्षा होण्याचे प्रमाण नगण्य आहे. याबाबतचे आकडेवारी पाहता शिक्षा झालेले गुन्हे 20 टक्क्याच्या खाली आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मध्ये त्यांच्या कार्य काळात वाढ झाल्याचे आकडेवारी समोर आली आहे. दारू मटका जुगार गांजा अमली पदार्थ या सर्व बेकायदेशीर धंदे सांभाळणारे मुख्य सूत्रधारांना पोलीस अधीक्षकांनी अभय दिले असून हप्तेबाजीमुळे खुलेआम हे बेकादेशीर धंदे सुरू आहेत. या प्रकरणात जे गुन्हे दाखल झाले आहे ते खाली काम करणाऱ्या टपरी पोरांवर दाखल झाले आहेत. यात फार मोठे रॅकेट पोलिसांच्या सहकार्यामुळे कार्यरत आहे व त्याला पूर्ण वरदहस्त जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचा असल्याचे अनेक पुरावे आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडले,

पर जिल्ह्यातून येणारे व गोव्याच्या लिकर इंडस्ट्रीला जाणारे स्पिरिट वाहतूक या जिल्ह्यातून राजरोसपणे सुरू आहे, या स्पिरिट मधून निर्माण झालेली बेकायदेशीर दारू पुन्हा या जिल्ह्यातून राज्यभर जात आहे. यालाही मोहन दहिकर यांचे पूर्ण अभय आहे. याबाबत राजापूर येथे सलग पकडलेल्या दारूचा तपशील आमदार निलेश राणे यांनी जाहीर केला. 30 जुलै 2025, 16 जुलै 2025, 3 सप्टेंबर 2025, 28 डिसेंबर 2025, 5 डिसेंबर 2025, 10 मे 2026, 22, 25 व 26 मे 2026, या दिनांकाच्या दिवशी फक्त राजापूर तालुक्यात सिंधुर्गातून वाहतूक झालेली कोट्यावधी रुपयांची दारू रत्नागिरी पोलिसांनी पकडली हे पोलीस रेकॉर्ड सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांची कार्यपद्धती संशयास्पद व हप्तेबाजी करत असलेली सिद्ध होते असा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला.

गोहत्या गो तस्करी याबाबत महाराष्ट्र सरकारने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली आहे, राज्यात असे प्रकार घडू नये म्हणून कटक कायद्याची सुधारणा केली आहे, मात्र तरीही सिंदुर्गात कुडाळ व सावंतवाडी येथे याबाबत गुन्हे घडत आहे, यालाही जिल्हा पोलीस अधीक्षकांचे पाठबळ मिळत आहे, गोहत्या व गो तस्करी याबाबतच्या घटना हिंदू संघटनांमुळे उघडकीस आले आहेत. अशा घटनांकडे या संघटनाने लक्ष वेधल्यामुळे व पकडून दिल्यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. स्वतःहून पोलिसांनी याबाबत एकही गुन्हा नोंद केल्याची घटना नाही. त्यामुळे याबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या कार्यपद्धतीबाबत, पालकमंत्री नितेश राणे यांनी यापूर्वीही स्वतः जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलीस अधीक्षकांना त्या संशितांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले होते. जिल्ह्यातील ही परिस्थिती पाहता व पोलीस अधीक्षकांचा हा कारभार पाहता त्यांचे या जिल्ह्यातून हकालपट्टी व्हावी अशी आपली भूमिका आहे. याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे व खासदार नारायण राणे यांचेही लक्ष वेधणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दोडामार्ग तालुक्यात रबर लागवडीच्या नावाखाली गांजाची लागवड होते. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक दहीकर यांनी कोणतेही गांभीर्य घेतले नाही. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असताना त्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. याबाबतही आपली तक्रार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.