मुंबई : उत्तर रेल्वेने गाडी क्रमांक १२४८४/१२४८३ अमृतसर–तिरुवनंतपुरम नॉर्थ–अमृतसर साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या डब्यांच्या रचनेत (Composition) कायमस्वरूपी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार गाडीतील विद्यमान दोन जनरेटर कारच्या ऐवजी एक एसएलआरडी (SLRD) डबा आणि एक जनरेटर कार ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गाडीच्या संरचनेत बदल होऊन प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
हा बदल गाडी क्रमांक १२४८४ अमृतसर–तिरुवनंतपुरम नॉर्थ सुपरफास्ट एक्स्प्रेससाठी ७ जून २०२६ पासून लागू झाला आहे. तसेच गाडी क्रमांक १२४८३ तिरुवनंतपुरम नॉर्थ–अमृतसर सुपरफास्ट एक्स्प्रेससाठी हा बदल १० जून २०२६ पासून लागू होणार आहे.
प्रवाशांनी गाडीचे अद्ययावत वेळापत्रक व इतर तपशील भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासावेत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.













