जि. प.शाळा इसवली सुतार पनोरे च्या मुलांना मिळणार पहिल्याच दिवशी मोफत स्कूल बॅग

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

संतोष कोत्रे
लांजा -: तालुक्यातील इसवली सुतार पनोरे या जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व मुलांना शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १५ जून रोजी मोफत स्कूल बॅग मिळणार आहेत. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे
ग्रामीण भागातील अनेक पालकांना शैक्षणिक साहित्य खरेदी करताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षणाची आवड वाढविण्यासाठी तसेच शिक्षणाच्या प्रवाहात कोणताही विद्यार्थी मागे राहू नये या उद्देशाने इसवली सुतार पनोरे या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वितरण करण्यात येणार आहे.
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विध्यार्थी मनोज आग्रे, संदीप मेस्त्री, दिनेश झोरे यांनी एकत्र येत व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रोहिदास मेस्त्री यांच्या सहकार्याने माजी विध्यार्थी यांनी पैसे गोळा करून उत्तम प्रतिच्या स्कुल बॅग खरेदी केले आहेत. यांचे वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी करण्यात येणार. तसेच भविष्यात शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अभ्यासिका, पुस्तकं, ए आय लॅब निर्माण करण्याचा मानस माजी विध्यार्थी दिनेश झोरे यांनी व्यक्त केला आहे.
माजी विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे पालक वर्ग ,ग्रामस्थ आणि शिक्षक यांनी कौतुक केले आहे.