वेंगुर्ले येथील मोटरसायकल चोरीचे दोन्ही गुन्हे उघड : एक गाडी हस्तगत..

स्थानिक गुन्हे शाखा व वेंगुर्ला पोलीस ठाणे यांची धडाकेबाज कामगिरी..

वेंगुर्ले : दाजी नाईक 

वेंगुर्ले तालुक्यातील मोटरसायकल चोरीचे दोन्ही गुन्हे उघड झाले आहेत. या चोरीतील संशयीत आरोपी सिद्धार्थ संदेश गावडे, वय १९ वर्षे, रा. चौकूळ खासकीवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. म्हापसा, गोवा यास ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व वेंगुर्ला पोलीस ठाणे यांनी ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.

वेंगुर्ला पोलीस ठाणे गु.र.नं. 108/2026 bns 303 ( 2 ) मध्ये फिर्यादी उदय पुंडलिक नाबर , रा. मोचेमाड वरची नाबरवाडी , ता. वेंगुर्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास वेंगुर्ला पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांचेकडून सुरू असताना तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे पीएसआय हडळ, पोशी अमर कांडर व पथक यांनी संशयीत आरोपी सिद्धार्थ संदेश गावडे, वय १९ वर्षे, रा. चौकूळ खासकीवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. म्हापसा, गोवा यास ताब्यात घेतले व वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. वेंगुर्ला पोलीस ठाणेचे पोलीस पथक यांनी

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली फसिनो दुचाकी ही एक गाडी हस्तगत केलेली आहे. सदर वाहन तपासकामी जप्त करण्यात आलेली आहै, तसेच गुन्हा रजिस्टर नंबर 89/2026 bns 303(2) हा गुन्हा देखील याचा आरोपीने केल्याचे कबूल केले आहे. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईकरिता ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कामगिरी श्रीमती नयोमी साठम, अप्पर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. निसर्ग ओतारी यांच्या नेतृत्वाखाली पोहेका राऊळ , पोहेका / सराफदार ,पोकॉ सरमळकर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पो.हवा राठोड, पोलीस कॉन्स्टेबल कांडर व इतर अधिकारी/अंमलदार यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश राऊळ वेंगुर्ला पोलीस स्टेशन हे करत आहेत.