मंडणगड | प्रतिनिधी: मंडणगड तालुका पत्रकार संघ ,मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. आयोजित,’ गाणे स्वातंत्र्याचे, गीत गायन स्पर्धा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने, देशभक्तीपर समूहगीत व वैयक्तिक गीत गायन स्पर्धा शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी भिंगळोली येथील, यादव चॅरिटेबल
ट्रस्टचे श्रीकृष्ण सभागृह येथे, आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये जवळजवळ तालुक्यातील सुमारे 40 संघाने सहभाग घेतला. या स्पर्धेत मंडणगड तालुका विकास मंडळ F1428 मुंबई संचलित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मंडणगड. या विद्यालयाने नेत्रदीपक व यश मिळवले आहे.१) प्राथमिक गटात तृतीय क्रमांक २)माध्यमिक गटात प्रथम क्रमांक ३)उच्च माध्यमिक गटात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या या अतुल्य कामगिरीबद्दल, सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे, तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. संजय अवेरे ,श्री. सुशील देवघरकर ,सौ. ज्योती राणे यांचेही संस्था पदाधिकारी, संस्था सदस्य, मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा पाटील, उपमुख्याध्यापक श्री. अर्जुन हुल्लोळी, पर्यवेक्षक श्री. शांताराम
बैकर व सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक वर्गाकडून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या उज्वल यशाबद्दल परिसरातूनही अभिनंदनचा वर्षाव होत आहे.










