रुण गोंधवली शाळेचा मुलांना मिळणार पहिल्याच दिवशी मोफत स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य

चंदुरकर परिवार व नवतरुण विकास मंडळ मुंबई ग्रामस्थ व रुण गोंधवलीवाडी ग्रामस्थ यांचा उपक्रम

लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुण गोंधवली च्या सर्व मुलांना पहिल्याच दिवशी मोफत स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य मिळणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षणाची आवड वाढवण्यासाठी तसेच शिक्षणाच्या प्रवाहात कोणताही विद्यार्थी मागे राहू नये या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी श्री चंदुरकर परिवार यांच्यावतीने कै. सौ राधिका कृष्णा चंदुरकर यांच्या स्मरणार्थ मुलांना मोफत स्कूल बॅग मिळणार आहेत. तसेच शैक्षणिक साहित्याची देखील वाटप केले जाणार आहे.
रुण गोंधवली या जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १५ जून रोजी मोफत स्कूल बॅग, शै. साहित्य मिळणार आहेत. श्री चंदुरकर परिवार व नवतरुण विकास मंडळ मुंबई ग्रामस्थ व रुण गोंधवली वाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.