मामा वरेरकर नाट्यगृह सुसज्ज करण्यासाठी १० कोटी मंजूर : उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे म्हणजे ‘देऊ तो शब्द पुर्ण करू’ हा अनुभव मालवण कुडाळ मतदार संघातील जनता घेत आहे. शेकडो कोटी निधी त्यांनी मतदार संघात आणला असून मतदार संघाचा गतिमान विकास सुरु आहे. मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृह सुसज्ज करण्यासाठी १० कोटी निधी मंजूर झाला आहे. याबाबत उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी जनतेच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.
आमदार निलेश राणे यांनी सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नगरविकास विभागांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून हा निधी मंजूर करून घेतला आहे. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह नादुरुस्त झाले होते, त्याच्या उभारणीसाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी नाट्यप्रेमींना दिले होते. या नाट्यगृहालाही पहिल्या टप्यात १० कोटींचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर करण्यात आला असून लवकरच कामाचा शुभारंभ होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. नाट्यगृह अद्ययावत होऊन नाट्यरसिकांच्या सेवेसाठी खुले होईल.
मालवण शहाराच्या विकासाचे व्हिजन आमदार निलेश राणे मांडले असून त्यानुसार अधिकाधिक विकासनिधी उपलब्ध होत आहे. संपुर्ण मतदार संघाचा गतिमान विकास हेच आमदार निलेश राणे यांचे लक्ष आहे. असेही दिपक पाटकर यांनी सांगितले.
मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध
आमदार निलेश राणे साहेब यांच्या नेतृत्वात मालवण शहाराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. खासदार नारायण राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचे मार्गदर्शन व सहकार्य तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या पाठपुराव्यातून विकास आणि जनसेवा हेच आमचे लक्ष आहे. यासाठी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आम्ही कटीबद्ध असल्याचे दिपक पाटकर यांनी सांगितले.












