मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यात वृक्ष लागवड मोहिमेस प्रारंभ

गुहागर | प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५८ वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुहागर तालुक्यामध्ये गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात झाली आहे.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले आहे. मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गुहागर – विजापूर या रस्त्याच्या दुतर्फा राज ठाकरे साहेबाच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त ५८ फळ आणि फुल झाडांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे.