चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावर्डे येथील महामार्गावर सिमेंट रोडला मोठा खड्डा पडल्याने येथे अपघात घडत आहेत. सदर खड्डा हा मृत्यूचा सापळा बनला आहे. मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ आधुनिकीकरणामुळे काँक्रीट रस्ता करण्यात रुंदीकरण करून करण्यात आला. परंतु महामार्ग पूर्ण होण्याच्या आत झालेला रस्ता हा ठिकठिकाणी उकरले जाऊन महामार्गावर खूप ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य उभे राहिल आहे. सदर खड्डे आणि अपूर्ण महामार्ग यामुळे मुंबई गोवा महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा महामार्ग बनत चालला आहे.
सावर्डे येथे आरती स्वीट समोर महामार्गावर दोन्ही बाजूने उतार असल्याने मधेच महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. तिथेच मोठा खड्डा पडून महामार्ग धोक्याचा बनला आहे. येथे त्या खड्ड्यात आपटून कितीतरी दुचाकी स्वार पडून अपघात घडले. तसेच खड्ड्यात आपटून चार चाकीचे टायर फुटण्याचे प्रकारपण घडले आहेत. महामार्गातील ठेकेदार कोणाचा मृत्यू वाट पाहत आहेत का.? असा प्रश्न ग्रामस्थातून आणि वाहन चालकांमधून उपस्थित होत आहे. सदर ठिकाणी पावसात पाणीच असते, त्यामुळे हा खड्डा दिसण्यात येणार नाही. यामुळे येथे मोठा अपघात घडून मृत्यूची शक्यता नाकारता येत नाही. तरी महामार्ग ठेकेदारांनी यावर ठोस उपाययोजना करावी. येथे अपघातात कोणाचा मृत्यू झाल्यास महामार्ग ठेकेदारावर मृत्यूस कारणीभूत ठरवून गुन्हा दाखल करावा लागेल, असे नागरिकांतून बोलले जात आहे. तरी ठेकेदाराने सावर्डे येथील आरती स्वीट समोरील या खड्ड्याचे ठोस उपाययोजना करून अपघात टाळावेत.













