तणावमुक्त जीवनासाठी भावनांवर नियंत्रण, सकारात्मक दृष्टिकोन व संतुलित जीवनशैली आवश्यक : डॉ. चंद्रशेखर हालिंगळे

वेंगुर्ले येथे मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती कार्यशाळा संपन्न..

वेंगुर्ले : दाजी नाईक

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, सकारात्मक दृष्टिकोन आणि संतुलित जीवनशैली राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. यामुळे मानसिक शांतता लाभते आणि शारीरिक आरोग्यही उत्तम राहते. तणावमुक्त आयुष्यासाठी नियमित व्यायाम आणि ध्यान, योगासने किंवा रोज १०-१५ मिनिटे ध्यान केल्याने मन शांत होते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते, असे प्रतिपादन डॉ. चंद्रशेखर हालिंगळे यांनी वेंगुर्ले येथे मार्गदर्शन करताना केले.

वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन आणि निर्मल हाॅस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथील साई डिलक्स सभागृह येथे आयोजित “मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती कार्यशाळा” उत्साहात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. चंद्रशेखर हालिंगळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. राजेश्वर उबाळे, सचिव डॉ. संजीव लिंगवत, डॉक्टर्स फ्रटर्नीटी क्लब अध्यक्षा सुरेखा काळे, डॉ. वामन कशाळीकर व डॉ. ज्ञानेश्वर शिवचरण उपस्थित होते. डॉ. चंद्रशेखर हालिंगळे पुढे म्हणाले की, प्रत्येकाला दररोज ७ ते ८ तासांची गाढ झोप मेंदूला विश्रांती देते, ज्यामुळे तणाव कमी होतो.छंदांना वेळ देणे, कामाव्यतिरिक्त स्वतःच्या आवडीच्या गोष्टींसाठी उदा. वाचन, गाणी ऐकणे, बागकामवेळ काढल्याने ताणतणाव दूर होण्यास मदत होते. मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापर टाळल्याने मेंदूला आराम मिळतो. सकारात्मक विचार व प्रत्येक गोष्टीतून शिकण्याची वृत्ती ठेवल्यास मानसिक तणाव कमी होतो, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. राजेश्वर उबाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संजीव लिंगवत यांनी केले. यावेळी डॉ. के. जी. केळकर, डॉ. सुदीश सावंत , डॉ. भिवा नाईक, डॉ. डि.टि गोसावी, डॉ. मिलिंद काळे, डॉ. श्याम रेडकर, डॉ. दत्ता पवार, डॉ. आर्. एम. परब, डॉ. वंदन वेंगुर्लेकर, ॲड. मनिष सातार्डेकर, डॉ. नामदेव मोरे , डॉ. श्रीराम हिर्लेकर, डॉ. सई लिंगवत, डॉ. दिपाली पालयेकर, डॉ. क्लारा होडावडेकर, डॉ. सिल्विया अल्मेडा, डॉ. रूपाली पवार, डॉ. राखी माधव, डॉ. दिपाली देसाई, डॉ. स्नेहा नवार, डॉ. सोनाली सावंत, डॉ. जुई पेडणेकर, डॉ. अबिदा परब, डॉ. किशोर धोंड, डॉ.अमेय खानोलकर, डॉ. रावजी सातोसकर, डॉ. सोनाली खानोलकर, डॉ. मानसी सातार्डेकर, डॉ. अश्विनी सामंत, श्रीया सावंत आदी डाॅक्टर मंडळी उपस्थित होते.