पालशेत हायस्कूलच्या इमारतीचा भाग कोसळला

गुहागरात पावसाने नुकसानीच्या घटना सुरूच
जिल्हा परिषद सदस्या अपूर्वा बारगोडे यांनी केली पाहणी

गुहागर | प्रतिनिधी : गेले दोन दिवस पडल्यानंतर बुधवारी सकाळी काही काळ उसंत घेतल्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. तीन दिवस पडलेल्या पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना सुरूच आहेत.

तालुक्यातील पालशेत हासकुल येथील इमारतीचा समोरिल काही भाग कोसळला. आरे बाजीप्रभू रोड ते लुंबिनी नगर ब्राम्हणवाडी कुंभवणेवाडी रस्त्यावरती झाड पडले. पालपेणे कुंभारवाडी येथे मारुती पिरदनकर यांच्या घरावर झाड पडले.
दरम्यान पालशेत हायस्कूलच्या इमारतीचा समोरिल काही भाग कोसळला असून सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्या अपूर्वा बारगोडे यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी करून मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा केली. इमारत नादुरुस्त झालेली असताना याकडे यापूर्वी सुट्टी काळात कोणतीच कार्यवाही का केली गेली नाही.सदर इमारतीचे ऑडिट केले गेले की नाही याबाबत देखील चर्चा करण्यात आली.यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्या मानसी रांगले, महेश तोडणकर आदी उपस्थित होते.