सावंतवाडी :हॉटेल रुची डिलक्स व कशाळीकर उद्योग समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी पुष्पगुच्छ व आर्थिक मदत देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
याच कार्यक्रमात सावंतवाडीतील प्रथितयश इंजिनिअर व उद्योजक नाना कशाळीकर आणि उद्योजिका मृणालिनी कशाळीकर यांची कन्या प्रा. सौ. भक्ती परांजपे यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला.
भक्ती कशाळीकर यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रातील सर्वोच्च पदवी असलेली पीएच.डी. विशेष गुणांसह प्राप्त केली आहे. त्या सध्या पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत आहेत.इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या विषयात त्यांनी संशोधन केले असून “Automatic Image Annotation Algorithm for Driver Assistance System” या विषयावर त्यांनी पीएच.डी. मिळवली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल कशाळीकर उद्योग समूहाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या संशोधनामुळे इंजिनिअरिंग क्षेत्रात नवे योगदान मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.












