उपाध्यक्षपदी विष्णू चव्हाण, सचिवपदी स्वप्नील कोलगांवकर तर कार्याध्यक्षपदी विजय चव्हाण यांची निवड
सावंतवाडी : कोलगाव येथील श्री देव नवरात्रोत्सव मंडळाची नुकतीच बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत मागील कार्यकारिणी बरखास्त करून आगामी नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत गटनेतेपदी बाबुराव चव्हाण, अध्यक्षपदी सागर चव्हाण, कार्याध्यक्षपदी विजय चव्हाण यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विष्णू चव्हाण, सचिवपदी स्वप्नील कोलगांवकर, सहसचिवपदी योगेश चव्हाण, खजिनदारपदी आनंद चव्हाण आणि सहखजिनदारपदी सुरेश चव्हाण यांची निवड झाली. तसेच मार्गदर्शकपदी जगदीश चव्हाण, सल्लागारपदी सदानंद चव्हाण, संपर्क प्रमुखपदी संतोष चव्हाण आणि सहसंपर्क प्रमुखपदी प्रकाश सांगेलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाचा घटस्थापना आणि नवरात्रोत्सव अधिक उत्साहात, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मंडळाच्या सदस्य व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.










