नाणार इंगळवाडी येथील 23 वर्षे तरुणाला अमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांनी पकडले

राजापूर | प्रतिनिधी: राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथील एका तरुण अमली सदृश पदार्थाचे सेवन करताना आढळून आल्याने नाटे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शकुल जहिर सोलकर (२३) रा. नाणार इंगळेवाडी असे या तरूणाचे नाव आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

नाणार इंगळवाडी परिसरात एका मोकळ्या जागेतील दगडाच्या आडोशाला अमली पदार्थाचे सेवन करण्याचे साहित्य स्वतः जवळ बाळगून अमली पदार्थाचे सेवन करताना सोलकर हा मिळून आला आहे. या घटनेची फिर्याद नाटे पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुरेश कुसाळे यांनी दिली असून यासंदर्भात नाटे पोलीस ठाणे येथे एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान या तरुणाकडे अमली पदार्थ सेवन करण्यासाठी ते साहित्य कुठून मिळाले आणि कोणाच्या संपर्कातून मिळाले याचा तपास पोलीसांनी करावा अशी मागणी होत आहे.